शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
7
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
8
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
9
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
10
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
11
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
12
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
13
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
14
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
15
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
16
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
17
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
18
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
19
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
20
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा

दूध; भुकटी अनुदानाचे राजकारण पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 00:26 IST

अशोक पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर (जि. सांगली) : आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे खासदार राजू शेट्टी यांनी दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान द्यावे यासाठी यल्गार पुकारला आहे, तर खा. शेट्टी यांचे आंदोलन मोडीत काढण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील , कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत, दुग्ध विकास मंत्री ...

अशोक पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर (जि. सांगली) : आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे खासदार राजू शेट्टी यांनी दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान द्यावे यासाठी यल्गार पुकारला आहे, तर खा. शेट्टी यांचे आंदोलन मोडीत काढण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत, दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी प्रयत्न चालवले आहेत. शेट्टींवर कडी करताना त्यांनी दूध भुकटीला प्रतिकिलो ५० रुपयांचे अनुदान देण्यासाठी पाठिंबा दिला आहे. यामुळे दूध उत्पादकांचा काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे ते चांगलेच संभ्रमात पडले आहेत.राज्यात गोकुळ (कोल्हापूर), राजहंस (संगमनेर), वारणा (वारणानगर), सोनाई (इंदापूर), गोविंद आणि स्वराज्य (फलटण) हे दररोज लाखो लिटर दुधाचे संकलन करतात. यापूर्वी राज्य शासनाने दूध भुकटीसाठी ५३ कोटींचे अनुदान दिले. परंतु त्याचा फायदा दूध उत्पादकांना झालाच नाही. याउलट दुधाचे दर २ रुपयांनी कमी झाले. त्यामुळेच राजू शेट्टी यांनी दूध उत्पादकांना लिटरमागे ५ रुपयाचे अनुदान द्यावे, अशी मागणी केली आहे. यासाठी १६ जुलै रोजी राज्यभर दूध बंद आंदोलनाचे हत्यारही त्यांनी उपसले आहे. काही खासगी भुकटी प्लँटधारकांनी मध्यंतरी पाशा पटेल यांच्या मध्यस्थीने दूध भुकटीसाठी अनुदान मिळावे, यासाठी प्रयत्न केले होते. परंतु सहकारी दूध संघांकडे किती दूध भुकटी शिल्लक आहे, याचा कधीच शासनाने आढावा घेतला नाही. खासगी दूध संघ आणि भुकटी प्लँटधारकांनी कमी दरात दूध घेऊन मोठ्या प्रमाणात भुकटीचे उत्पादन केले आहे. त्यामुळेच काही मंत्र्यांना हाताशी धरुन भुकटीवरच अनुदान मिळविण्याचा डाव आखला आहे. परंतु याचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच खा. शेट्टी यांनी हे आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. शासनाच्यावतीने मात्र भुकटी निर्यातीलाच अनुदान देऊन शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे दूध उत्पादक संभ्रमात आहेत. हातकणंगले लोकसभा मतदार संघातून शेतकºयांची ताकद घेऊन शेट्टी पुन्हा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. गत निवडणुकीत साखरसम्राटच शेट्टी यांच्या विरोधात होते. आता राज्यातील बहुतांशी साखरसम्राटांनी उसाला चांगला दर दिला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी नेत्यांपासून दुरावला आहे. त्यातच शेट्टी-खोत यांचे स्वार्थी राजकारण चव्हाट्यावर आले आहे. म्हणूनच खा. शेट्टी भाजपप्रणित महाआघाडीतून घुमजाव करून शेतकºयांच्या मेळ्यात डेरेदाखल झाले आहेत. आता त्यांचा लढा दूध उत्पादकांना अनुदान मिळवून देण्यासाठी सुरू आहे. तो मोडीत काढण्यासाठी राज्यातील एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री सरसावले आहेत.‘हातकणंगले’चा उमेदवार कोण?हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शेट्टी यांच्याविरोधात कोण, याचे उत्तर भाजप आणि आघाडी काँग्रेसकडे सध्यातरी नाही. शेट्टींच्या विरोधात कृषी राज्यमंत्री खोत यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली आहे. परंतु, खोत यांनी आपल्यावरील ओझे वारणा खोºयातील माजी मंत्री विनय कोरे यांच्या खांद्यावर टाकण्याची तयारी सुरू केली आहे.केरळ, गोवा राज्य दुधाला लिटरमागे ८ रुपयांचे, तर कर्नाटक लिटरमागे ५ रुपये दूध उत्पादकांना अनुदान देते. आतापर्यंत शासनाने दूध भुकटीला ५३ कोटींचे अनुदान दिले आहे. तरीही दुधाचे दर २ रुपयांनी कमी झाले आहेत. आता सरकार पुन्हा काही दूध संघांना हाताशी धरुन दूध उत्पादकांची फसवणूक करीत आहेत. आमची मागणी थेट दूध उत्पादकांना अनुदान देण्याची आहे. यासाठी आम्ही राज्यभर आंदोलन छेडणार आहोत.- राजू शेट्टी, खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना.महाराष्ट्रातील दूध उत्पादक आणि दूध संघांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी, अतिरिक्त झालेल्या व निर्माण होत असलेल्या दूध भुकटी निर्यातीवर प्रति किलो ५० रुपये व दुधास प्रति लिटर ५ रुपये निर्यात अनुदान देण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करत आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा सुरु आहे. दूध उत्पादकांना न्याय मिळवून देणारच.- सदाभाऊ खोत, कृषी राज्यमंत्री.